ज्ञानप्रिय, खा.म. मंडळमी माझे मनोगत थोडक्यात देत आहे. मंदळाची स्थापना करते वेळी एकच ध्येय होने की, खान्देशातील आपली संस्कृती बालीरीती यांची जपणूक व्हावे, शहरात आलेल्या बांधवाच्या पुढील वारसा मिळावा हा होता, त्याचप्रमाणे सुख दुःखाला आपण सर्व एकत्र येण्याचे व्यासपीठ असावे म्हणून खान्देशी बांधवांना एकत्र आणून मंडळाची स्थापना झाली. १ मे १९८६ आणि म्हणता म्हणता मंडळ बाढीला लागले. स्वत: ची वास्तु उभी राहिली अर्थात याला सर्वांचे सहकार्य लाभले म्हणून.हा देश मोठा झाला पाहिजे त्याचबरोबर अगोदर मी सुद्धा मोठा झाली पाहिजे. म्हणनेच आपण चांगले कर्म केले पाहिजे. ज्या समाजातून मी पुढे आलो आहे त्यांचे ऋण माझ्यावर आहे ते फेडण्याकरिता चांगले काम करणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून मी समाजाकरिता चांगले काम करीत पाहिजे, त्यातून मला प्रसन्नता मिळेल तशी प्रसन्नता मला चांगले कामामुळे मिळत आहे. माझ्या प्रसन्नेतील ही प्रेरणा माझे कुटुंब माझा समाज माझा देश आणि सर्व मानवता येथपर्यंत विशाल होत जावो.मंडळातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपण आपल्या वेळेनुसार या मंडळाला पुढे नेण्याकरिता हातभार लावावा. कोणत्याही संस्थेत वाद विवाद होत असता परंतु चांगल्या गोष्टी घेत जावून वाईट गोष्टी सोडून द्याव्या.व्यवस्थापन सांभाळणाऱ्यांनी सुद्धा हेवे दावे बाजूला ठेवून सर्वांन करिता चांगले काम करावे. आपण चालक आहोत मंडळाचे मालक नाही. फक्त ट्रस्टी म्हणून काम करावे शेवटी या संस्थेचा मालक म्हणजे थोडक्यात धर्मदाय आयुक्त आहे. त्यांचा वचक आपल्यावर असतो. सर्व नियम पाळूनच आपल्याला काम करायचे आहे. तेव्हा सर्व संघटित राहू एकत्र एका छता खाली राहू, या गोवर्धन पर्वताला उचलण्याकरिता आपण ही प्रयत्न करुया. पुढे थोड्याच दिवसात आपल्याला शेजारील जागेत वास्तू उभी करायची आहे त्याकरिता आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. महाराष्ट्रात जास्त टक्के मराठा माणूस आहे. परंतु आपली मुले जास्त प्रमाणात पुढे जायला हवी तशी गेली नाही. तेव्हा नवीन पिढी घडवण्याकरिता नापण चांगले मार्गदर्शन देऊया, झेंडे घेऊन फिरणे व संतरज्या उचलण्याचे दिवस गेले पाहिजे. असो लिहण्यासारखे रूप आहे.सर्वांना १ मे च्या हार्दिक शुभेच्छा !