Responsive image

मनोगत

श्री. संतोष दामोदर पाटील

मला लहानपणापासून समाजकार्यात मनःपूर्वक नहभाग घेण्याची आवड आहे. १९६० साली अकरावी एम.एस.सी. पास होताच जळगाव जिल्ला सहकारी बँकेत कारकून माणून नोकरीस लागलो, कॉलेज शिक्षण घेण्यासाठी एम. जे. कॉलेजमध्ये बी.कॉम होण्यासाठी सकाळच्या म प्रवेश घेतला, नोकरी करत असतांना कर्मचारी सोसायटी मध्ये कार्यकारिणीत, तसेच युनियन मध्ये स्वजिनवार माणून सहभाग घेतला, जिल्का व.वा. वाचनालयात कार्यकारिणी सवस्य झाली. अशाप्रकारे नोकरी सांभाळून बी. कॉम. शाली, बँकेत शाखा अधिकारी माणून बद मिळवली, जिल्ह्यापेक्षा राज्यस्तरावर नोकरी करावी माणून कृषीउद्योग विकास महामंडळ, मुंबई येथे मे १९६९ ला असि अकोट म्हणून नोकरी लागलो, वर तीन वर्षानी बढ़ती मिळवत व्यवस्थापक, उच्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक अशा बढतीच्या जागी यशस्वीपणे जबाबदा-या सांभाज ३१ मार्च १९९६ ला स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. मी खान्देश मराठा मंडळात स्थापनेपासून सक्रियसहभाग घेत होतो. शासकीय नोकरीमुळे मंडळात पदाधिकारी हो सकत नकली माणू सङ्गागार म्हणून मंडळात सहभागी होती. मंडळाची स्वत:ची जागा नसल्याने काही वर्षे चिंचवड येथे माझ्या घरी मंडळाच्या मासिक सभा होत होत्या मंडळात आजीव सभासव मिळवून देण्यासाठी शनिवार रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी माझ्या वाहनातून मंडळाच्या पदाधिकान्याना मथत करत होतो. नंतर एप्रिल १९९६ पासून कृषी उद्योग महामंडळातून सेवानिवृत्त होताच मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला, मंडळाचे स्वतःचे मालकीचे सभागृह बांधण्यासाठी झपाटल्यासारखे सहका-यासह पिंपरी चिंचवड व पुणे परिसर तसेच जळगाव, पुळे, नंदुरबार, नागिक औरंगाबाद परिसरात इमारत निधी र आजीव सभासण मिळवण्यासाठी अक्षरशः हालात झोळी घेवून फिरत होतो. शेवटी अपार कष्ट पेवून काही लाखांचा निधी गोळा करून मंडळासाठी निगडी प्राधिकरणाकडून १० गुंठ्यांचा पॉट विकत घेतला. आता पुढचा टप्पा वा जागेवर स्वतःचे हक्काचे व्यासपीठ असलेले सांस्कृतिक भवन बांधण्याचा होता. पुन्हा इमारत निधी गोळा करण्यासाठी आमची धडपड सुरु झाली. आम्ही खान्देशात व पिंपरी चिंचवड पुणे परिसरात समानातील उदार लोकांचे उंबरठे झीनबू लागलो.सभागृहासाठी अंदाजे २० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मोठ्या कष्टाने आम्ही काही लाखांचा इमारत निधी जमा केला पण ती रक्कम अपुरी होती. म्हणून मी स्वतः व माझ्या काही सहका-यांनी आमची वैयक्तिक मालमत्ता भगिनी निवेदित बँकेकडे तारण ठेवून बांधकामासाठी कर्ज घेतले, बाता आर्किटेक्ट, बांधकाम कंत्राटवार पांच्या मदतीने युद्धपातळीवर काम करून सभागृहाचे काम पूर्ण केले. आमचे स्वतःचे व्यासपीठ असण्याचे स्वप्न साकार झाले होते.