Responsive image

मनोगत

श्री. भिकन दयाराम पाटील

मित्रहो! मानवाने मिळवलेल्या बुद्धीच्या आधारे विकासाच्या विशेने वाटचाल सुरु केली. सर्वांगीण विकास साधण्यासाठी निरनिराळे मार्ग अवलंबले गेले. त्यातलाच एक मार्ग म्हणून धुळे, जळगाव, नाशिक व नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातील मराठा समाज नोकरी व्यवसायानिमित्त व ज्ञानार्जनासाठी, खान्देशातून पिंपरी आणि चिंचवड परिसरात वास्तव्यास आला. आपले समाज व पुण्यनगरीत बाजूला पसरलेला आहे. त्यांना एकत्र आणले त्यांच्या अडचणी सोडवणे परस्पर जनसंपर्क वाढवणे, समाजात बंधुभाव एकता निर्माण करणे, दुःखी पीडितांचे अश्रू पुसणे, संकट ग्रस्तांना मदतीचा हात देणे गरज होती म्हणूनच आपल्यातील काही समाज प्रेमी मंडळींनी एकत्र येऊन आपला मराठा समाज एकत्र करण्याचा निश्चय केला या कामाची सुरुवात सर्वसामान्य कामगार वर्गातील समाजसेवकांनी आकुर्डी गावातील विठ्ठल मंदिरात एकत्र येऊन श्री विठ्ठल रखुमाईला साक्षी ठेवून १ मे १९८६ रोजी आपल्या खान्देश मराठा मंडळाची स्थापना केली, एक छोटेसे रोपटे लावले तेच आज सर्व कार्यकारिणीच्या प्रयत्नांना वटवृक्षासारखे मोठे होत चालले आहे. मित्रहो! आम्ही सर्व मागील कार्यकारिणी सदस्यांनी झपाटल्यासारखे काम सुरु केले परंतु ज्या प्रमाणात समाजबांधव पुणे परिसरात आहेत त्याच विचार करता अजून बहुसंख्य समाज बांधव सभासद झालेले नाही याची खंत वाटते. समाज बांधवांनी जागृत व्हावी ही विनंती. हे सगळे करत असताना मंडळासाठी जागा असावी, ऑफिस असावे त्यासाठी आपल्या समाजातील दानशूर व्यक्तींच्या भेटी घेतल्या, देणग्या घेतल्या. त्यासाठी विविध कार्यक्रम उदाहरणार्थ नाटक, आर्केस्ट्रा कार्यक्रम राबवून त्यातून पैसा उभा करण्याचा प्रयत्न केला. याचंच यश १९८९ साली नवनगर विकास प्राधिकरण निगडी पुणे येथे मंडळाने अर्ज केला व ११ गुंठे सार्वजनिक सुविधांच्या वापरासाठी जागा आपल्याला त्यावेळेस मिळाली त्यावेळेस खरेदीसाठी पैसा नव्हता व ती मुदत बाढून घेतली व १९९४ साली ती जागा खरेदी केली. प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे खरेदी झाल्यापासून तीन वर्षात बांधकाम करायचं असतं म्हणून तात्पुरत्या स्वरुपाचे दोन खोल्यांचे कार्यालय बांधले व पुढे त्या जागेवर भगिनी निवेदिता बँकेचे २० लाख रुपये कर्ज घेऊन पूर्ण होत नव्हते त्यावेळी आम्ही सर्व संचालक यांनी दुर्गा टेकडी वर मिटींग घेऊन वैयक्तिकरित्या आर्थिक मदत करण्यासंदर्भात चर्चा केली व मी प्रथम ५०,००० रुपयांचा चेक देऊन त्यावेळेस मंडळाची वास्तूचे काम थांबू नये म्हणून काढून दिला व त्यानंतर इतर संचालकांनी काही रक्कम दिली व शिखर गाठले. अशा प्रकारे २००१ मध्ये सांस्कृतिक भवन बांधून समाजाचे स्वप्न साकार केले व बऱ्याच महिन्यांनी ही रक्कम परत मंडळाने परत केली.