Responsive image
Blog Image

2024-10-20

वधुवर पालक परिचय मेळावा २०.१०.२०२४

खान्देश मराठा मंडळाच्या वतीने खान्देशी मराठा समाज बांधवांचा वधू वर पालक परिचय मेळावा दिनांक २०.१०.२०२४ रोजी संपन्न झाला यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री मकरंद निकमसाहेब, डॉ.श्री.दिलीप पाटील साहेब, श्री राहुल पाटीलसाहेब, खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री मधूकर सोनू पगार, श्री युवराज साळुंखे,  ज्येष्ठ उद्योजक श्री हंबीरराव चव्हाण यांच्या हस्ते आणि खान्देश मराठा मंडळाचे सर्व कार्यकारणी कमिटी, मार्गदर्शक कमिटी यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन झाले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांचा परिचय वाचन श्री धनंजय पाटील,श्री सुरेश पाटील, श्री एस आर पाटील, यांनी केला आणि श्री नंदकुमार बेडसे साहेब यांचा मेसेज श्री बी डी पाटील यांनी वाचून दाखविला.व श्री नंदकुमार बेडसे यांना आयएएस म्हणून बढती झाल्याबद्दल सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्यात.*मंडळाच्या नवीन सुची व २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रमुख पाहूणे आणि अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले*प्रमुख पाहुण्यांच्या आणि मान्यवरांचा सत्कार झाला भाषणामध्ये मंडळाने सुरू केलेला हा उपक्रम खूप समाजाला आवश्यक व चांगला आहे. मंडळाच्या पुढील उपक्रमासाठी आम्ही पाहिजे ती मदत करायला तयार आहोत.मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकर सोनू पगार, उपाध्यक्ष श्री.सयाजीराव रामराव पाटील, सचिव श्री.प्रदीप दामोदर शिंदे, खजिनदार श्री.भास्कर दगडू पाटील, सहसचिव श्री.अनिल फकीरा सावंत, संचालक श्री.मिलिंद भास्कर पाटील, श्री.संजय भागवत पाटील, श्री जयवंत सिसोदे, श्री.सुरेश भगवान पाटील, श्री.कृष्णराव चैत्राम अहिरराव आणि मार्गदर्शक कमिटी मधील श्री.बी.के पाटील, श्री.संतोष दामोदर पाटील, श्री.भिकनराव दयाराम पाटील, श्री.माधव बाबुराव पवार, आदी मान्यवर उपस्थित होते मंडळाचे सचिव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.मंडळाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. पालकांनी कर्ज काढून देखाव्यासाठी खूप मोठा लग्नसाठी खर्च करू नये त्या ऐवजी त्यात वाचलेला पैसा हा त्यांच्या पुढील संसारी गरजा भागवण्यासाठी उपयोगात आणावे असे सुचविले.वधू वर यांचा परिचय पत्रक वाचन श्री मिलिंद पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल सावंत यांनी केले.आणि कार्यक्रमाचे आभार श्री सुरेश पाटील यांनी केले.कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर पाटील, रवींद्र पाटील, संदीप पाटील, मोतीराम पाटील, शशिकांत पाटील, बुद्धिराज जोगदंड, एकनाथ अहिरे, डॉ. सुदाम बाबुराव पाटील, निंबा अभिमन भामरे, ज्ञानेश्वर निंबा एंडाईत, सौ.राखी सचिन निकम, सौ कल्याणी रावसाहेब भोसले, आशाबाई दिपक सोनवणे, प्रियांका संदीप सोनवणे, रोहिणी ज्ञानेश्वर पाटील, यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रम संपताना सर्वांनी सुरुची भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेत आलेल्या पालकांशी एकमेकांशी चर्चा करण्यास पूरेशी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली   Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image Blog Image
Event Details
  • Date:

    2024-10-20

  • Location:

    खान्देश मराठा मंडळ सभागृह